Google वर कान्होजी आंग्रेंचा उल्लेख 'समुद्री चाचे'! धक्कादायक बाब

आंग्रे यांच्या नावाचा उल्लेख हा लुटारु असल्याचे दिसून आले आहे. सदर बाब डॉ. प्रशांत भाम्रे यांनी ट्विट करुन समोर आणली आहे.
Kanhoji Angre
Kanhoji Angre esakal
Updated on

Kanhoji Angre: हिंदवी स्वराज्यातील मराठा आरमाराचे प्रमुख म्हणून ज्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो त्या कान्होजी आंग्रे यांची ओळख गुगलनं भलतीच करुन दिली आहे. त्यावर आंग्रे यांच्या नावाचा उल्लेख हा लुटारु असल्याचे दिसून आले आहे. सदर बाब डॉ. प्रशांत भाम्रे यांनी ट्विट करुन समोर आणली आहे. सध्या सोशल मीडियावर कान्होजी आंग्रे आणि तो उल्लेख असलेला फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भाम्रे यांनी ट्विट करत त्यात लिहिले आहे की, गुगल वर 'कान्होजी आंग्रे' सर्च करा, नावा पुढे दिसणारे तीन डॉट वर क्लीक करून 'send feedback' क्लिक करा, नवीन window open झाल्यावर तिथे 'incorrect' वर क्लिक करून 'फीडबॅक' मध्ये 'Maratha Navy Admiral' असे लिहून सेंड करा! लोकांना देखील असे करण्यासाठी आव्हान करा. असे भाम्रे यांनी म्हटले आहे.

Kanhoji Angre
Shivsena Battle: तुम्हाला काय वाटतं, कोणतं नाव अन् चिन्ह उद्धव ठाकरेंसाठी योग्य?

आंग्रे हे मराठा आरमाराचे प्रमुख होते. त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढून मराठा आरमाराची स्थापना केली. त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे, किल्ले काबीज करण्याची परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती. भारताच्या किनारपट्टीवरील बंदरे ताब्यात ठेवून आपला व्यापारी माल युरोपमध्ये पाठवण्यासाठी त्यांचा वापर करण्याची त्यांना आवश्यकता वाटत होती.कान्होजींनी आरमार स्थापन करण्यापासून ते संपूर्ण किनारपट्टीवर आपली सत्ता निर्माण केल्याचे सांगण्यात येते.

Kanhoji Angre
Narayan Rane: नारायण राणेंचा संयम सुटला! 'उद्धव म्हणजे...'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com