Karuna Sharma
Karuna SharmaSakal

धनंजय मुडेंच्या विरोधात लढणार : करुणा शर्मा

धनंजय मुंडे यांच्याविरोधात परळी विधानसभा मतदारसंघातून मी लढणार आहे,’’ अशी माहिती करुणा शर्मा यांनी गुरुवारी येथे दिली.

नगर : ‘‘महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी शिवशक्ती सेना पक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. पक्ष राज्यातील सर्व निवडणुका लढविणार आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात परळी विधानसभा मतदारसंघातून मी लढणार आहे,’’ अशी माहिती करुणा शर्मा यांनी गुरुवारी येथे दिली.

शर्मा यांना बीड जिल्ह्यात (Beed District) जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी आज नगर शहरात पत्रकार परिषदेत घेत, राजकीय वाटचालीविषयी माहिती दिली. करुणा शर्मा म्हणाल्या, की महाराष्ट्रामध्ये हजारो कोटींचे गैरव्यवहार होतात. पक्षात येण्यापासून निवडणूक लढविणे आणि मंत्री होईपर्यंत कोट्यवधी रुपये दिल्याशिवाय पदे मिळत नाहीत.

हा सर्व भ्रष्टाचार संपवण्यासाठी माझा पक्ष काम करणार आहे. भ्रष्टाचार मंत्री करतात आणि अधिकारी, पोलिस अधिकारी यांना बळी दिले जाते. २५ वर्षे मी हे घरातही पाहिले आहे. त्यामुळे आता ते संपवायचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com