धक्का कुणाला? निकालाची उत्सुकता शिगेला; सत्तारूढ विरुद्ध शिवसेनेत चुरस

शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांसाठी ‘रेड कार्पेट’
hasan mushrif, satej patil, sanjay mandlik
hasan mushrif, satej patil, sanjay mandlikesakal

कोल्हापूर: आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी गाजलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (KDCC Bank Election)चुरशीने वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा धक्का कोणाला बसणार याविषयी उत्सुकता आहे. दोन्ही आघाड्यांनी विजयाचा दावा केला असला तरी प्रक्रिया व पतसंस्था गटाबरोबरच महिला प्रतिनिधी गटात काय होते याकडे अधिक लक्ष असणार आहे.

काल चुरशीने ९८ टक्के मतदान झाले. यापूर्वीच्या निवडणुकीच्या तुलनेत या वेळी टक्केवारी वाढली आहे. दोन्ही आघाड्यांकडून मातब्बर रिंगणात आहेत, त्यातून मतदानाची टक्केवारी वाढली आहे. या वाढलेल्या टक्केवारीचाच धसका उमेदवारांना बसला आहे. मतदानानंतर तालुकानिहाय आकडेमोड करत आपल्या उमेदवाराला किती मते मिळतील याचा ताळमेळ उमेदवार व कार्यकर्त्यांच्या पातळीवर घातला जात आहे.

सत्तारूढ विरुद्ध शिवसेनेच्या नेतृत्‍वाखाली समविचारी पक्षांचे पॅनेल अशी लढत होती. तीन जागा सत्तारूढ गटाने न दिल्याच्या रागातून शिवसेनेने महाविकास आघाडीतून काडीमोड घेत पॅनेलची बांधणी केली. सत्तारूढ गटासोबत भाजप तर शिवसेनेसोबत शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह आरपीआय गट राहिले. लढत दोन पॅनेलमध्ये असली तरी आरोप-प्रत्यारोप मात्र पालकमंत्री सतेज पाटील,(Satej Patil) ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) विरुद्ध खासदार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik)व शिवसेना(Shivsena)यांच्यातच होत राहिले.

राखीव नऊ जागांसाठी झालेल्या लढतीपैकी प्रक्रिया व पतसंस्था गटातच चुरस आहे. प्रक्रिया संस्था गटातून स्वतः प्रा. मंडलिक यांच्यासह विद्यमान संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी सत्तारूढ गटासमोर आव्हान उभे केले आहे. सत्तारूढ गटाकडून प्रदीप पाटील-भुयेकर व मदन कारंडे या गटातून नशीब आजमावत असले तरी या गटातील लढत ‘नुरा कुस्ती’ असल्याचे बोलले जाते, याचीही सत्यता शुक्रवारच्या मतमोजणीत समजेल.

hasan mushrif, satej patil, sanjay mandlik
कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी मंत्री मुश्रीफ घेणार अजित पवारांची भेट

प्रक्रियानंतर पतसंस्था गटात तिरंगी लढतीमुळे चुरस निर्माण झाली आहे. या गटातील विद्यमान संचालक अनिल पाटील यांना सत्तारूढने उमेदवारी नाकारून त्यांच्याऐवजी आमदार प्रकाश आवाडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पाटील हेही अपक्ष म्हणून रिंगणात आहेत तर विरोधी आघाडीकडून प्रा. अर्जुन आबिटकर उमेदवार आहे. या गटातही शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांना ‘लक्ष्मी’ दर्शन झाल्याने या गटातील निकालाबाबतही मोठी उत्सुकता आहे.

महिला गटातही कधी नव्हे ती चुरस निर्माण झाली आहे. या गटातून सत्तारूढमधून माजी खासदार श्रीमती निवेदिता माने व श्रृतिका काटकर तर विरोधी आघाडीकडून रेखा कुराडे व लतिका शिंदे रिंगणात आहेत. या गटातील सत्तारूढ गटाच्या एका जागेबाबत सर्वाधिक उत्सुकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com