गुलालाची संधी कोणाला? राज्यमंत्र्यांना की राजू शेट्टींना...

बॅंकेच्या निकालाकडे कोल्हापूरबरेाबरच संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Rajendra Patil Yadravkar,Raju Shetti
Rajendra Patil Yadravkar,Raju ShettiEsakal

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत (Kolhapur District Bank Elections Result) चुरशीने 98 टक्के मतदान झाले. महाविकास आघाडीतील शिवसेना (Shivsena)ही या ठिकाणी विरोधात होती आणि भाजप हा सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर होता. त्यामुळे कोण बाजी मारणार, याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. सर्वाधिक चुरस ही शिरोळ तालुका विकास संस्था गटातील उमेदवार राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar) आणि गणपतराव पाटील यांच्यात दिसून आली. याठिकाणी माजी खासदार राजू शेट्टींनी (Raju Shetti) आपली ताकद पाटील यांच्या पाठीशी उभी केली आहे. नागरी सहकारी बॅंका व पतसंस्था गटात कोण कोणाचा कार्यक्रम करणार, अशी चर्चा रंगली आहे, त्यामुळे बॅंकेच्या निकालाकडे कोल्हापूरबरेाबरच संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राज्यात आघाडीवर असणाऱ्या काही जिल्हा बॅंकांमध्ये कोल्हापूर बॅंकेचा क्रमांक वरचा आहे. ही बॅंक ताब्यात ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप (Congress, NCP, BJP) यांच्या पॅनेल तसेच शिवसेनेच्या पॅनेलने शर्थीने निवडणूक लढवली आहे. प्रचारात आलेल्या रंगतीप्रमाणेच मतदानही ९८ टक्के झाले आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Rajendra Patil Yadravkar,Raju Shetti
Photo: रंगीत फेटे अन् चर्चा; दोन्ही गटांकडून विजयाचे दावे

दरम्यान, जिल्हा बॅंकेच्या नागरी सहकारी बॅंका, पतसंस्था गट, शिरोळ तालुका विकास संस्था गट, प्रकिया गट आणि महिला राखीव गटात चुरस दिसून येत आहे. यामध्ये कोण बाजी मारणार किंवा कोण कोणाचा करेक्‍ट कार्यक्रम करणार हे उद्या (ता. ७ जानेवारी) सकाळी कळणार आहे.

कोल्हापूर जिल्हा बॅंकेसाठी मंगळवारी (ता. 5) चुरशीने मतदान झाले, त्यानंतर कोण-कोणत्या गटात चुरस होईल, याची चर्चा जिल्हाभर सुरु आहे. बॅंकेच्या शिरोळ संस्था गटातून उमेदवार असणारे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मतदान झाल्यानंतर विजयी जल्लोष केला. तसेच, त्यांच्या विजयाचे डिजिटल फलकही झळकले आहेत. यड्रावकर यांच्याविरोधात गणपतराव पाटील यांनीही तेवढ्याच ताकदीने प्रचार करुन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. शिवाय त्यांच्या पाठीशी आपली ताकद लावून माजी खासदार राजू शेट्टी हे स्वत: पाटील यांचे मतदान प्रतिनिधी म्हणून केंद्रात उपस्थित होते, त्यामुळे या लढतीकडे कोल्हापूर जिल्ह्याचेच नव्हे; तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com