'स्वतःच्या खुर्चीसाठी पक्षाचा बळी द्यायलाही धैर्य लागतं'

'स्वतःच्या खुर्चीसाठी पक्षाचा बळी देण्याचा नवा प्रयोग करायलाही धैर्य लागतं, यांना जमते कसे काय?'
Political
Politicalesakal
Summary

'स्वतःच्या खुर्चीसाठी पक्षाचा बळी देण्याचा नवा प्रयोग करायलाही धैर्य लागतं, यांना जमते कसे काय?'

सध्या कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणूक मतदानाची तारीख जवळ येईल तसा निवडणुकीचा जोर वाढत चालला आहे. उत्तरच्या निवडणुकीमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विविध पक्षातील सर्व दिग्गज नेतेमंडळींनी आपापल्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा लावले असल्याची चिन्ह दिसत आहेत. (Kolhapur By Election 2022) दरम्यान, मागील काही दिवसांपासून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा, प्रचाराने गती घेतली असून आरोपप्रत्यारोप आणि दावेप्रतिदावे पहायला मिळत आहे. दरम्यान, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Thackeray) यांनी कोल्हापुरात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हिंदुत्वावरून भाजपावर सडकून टीका केली. यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवारही केला.

Political
पवारांच्या घरावरील हल्लाप्रकरणी काहीजण ताब्यात; पत्रकारही रडावर

परंतु आता एक वेगळी बातमी समोर येत आहे. भाजपाचे केशव उपाध्ये यांनी भाजपच्या टीकेवरुन मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणतात, गेल्या काही वर्षात कोल्हापूर उत्तर ही विधानसभा सातपैकी भाजपासोबत युतीत राहून शिवसेनेनं पाचवेळा जिंकली आहे. फक्त दोन वेळा कॉंग्रेसला मिळाली आहे. हिंदुत्वाला मानणारा हा मतदारवर्ग आहे. मात्र आज हीच परंपरागत शिवसेनेची जागा मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेसला (Congress) दिली आहे. अशीच जागा त्यांनी नांदेडलाही दिली आहे. हक्काच्या जागा कॉंग्रेसला देत माझ्या मुख्यमंत्रिपदासाठी तुम्ही त्याग करा, असे जाहीर बोलायला धाडस लागते. स्वतःच्या खुर्चीसाठी पक्षाचा बळी देण्याचा नवा प्रयोग करायलाही धैर्य लागते. यांना हे जमते कसे काय?, असा खोचक सवाल उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

Political
PM पदाची शपथ घेण्याआधी काश्मीर प्रश्नावर शरीफ यांचं वक्तव्य

काय म्हणालेत काल मुख्यमंत्री ठाकरे

कुस्तीसाठी भाजप उतरला तर स्पर्धेआधी धाडी टाकतील. कोल्हापूर भगव्याचा बालेकिल्ला आहे. मर्दाने मर्दासारखं लढावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या शिवसैनिकांशी संवाद साधताना भाजपवर टीकास्त्र सोडले. सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आले होते तेव्हा त्यांनी महाविकासआघाडी वर निशाणा साधला याला प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. आम्ही शिवरायांचे मर्द मावळे आहोत. खोटं बोलणे आमच्या रक्तात नाही. आम्ही खोटं बोलण्यात कमी पडतो पण खोटं बोलणं रक्तात नाही असाही टोला लगावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com