Shivsena Political News I शिवरायांची शिकवण विसरले अन् हिंदुत्वही सोडल, भाजपचा सेनेला खोचक टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP on Shivena Eknath shinde protection to mla

आमदारांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची, एकनाथ शिंदेंचं पत्र

शिवरायांची शिकवण विसरले अन् हिंदुत्वही सोडल, भाजपचा सेनेला टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळेसे पाटील यांनी बंडखोर आमदारांचे संरक्षण काढून घेतले आहे. राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. (maharashtra politics) आमदारांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असं एक पत्र एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडी सरकारला लिहलं आहे. या मुद्द्यावरून आता भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधल आहे. (BJP on Shivena Eknath shinde protection to mla)

हेही वाचा: राजकारणात वाद असावेत द्वेष नाही, लवकर बरे व्हा : आव्हाड

भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, शत्रु राज्यातील महिलांनाही सन्मान देणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याच नावाने संघटना चालविणारे आज आकसाने आमदारांच्या कुटंबियांचे सरंक्षण काढून घेत आहेत. शिवरायांची शिकवण विसरले अन् हिंदुत्वही सोडल, अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला आहे

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींचा वेग वाढलाय. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना विरोधात बंड पुकारल्यामुळे राजकीय वातावरण तापलंय. दरम्यान, आता एकनाथ शिंदे यांनी एक ट्वीट करत सरकारला इशारा दिलायं. त्यांच्या या पत्रानंतर आता भाजप आक्रमक झाला आहे. केशव उपाध्याय यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सेनेला टोला लगावला आहे. त्यामुळे आता सेना यावर काय प्रतित्त्युर देणार पहावे लागणाल आहे.

हेही वाचा: शिंदेंचा मविआला थेट इशारा, आमदार कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी...

दरम्यान, एका बाजूला एकनाथ शिंदे यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी राज्य सरकारने बंडखोर आमदारांसह त्यांच्या कुटुबियांनादेखील सुरक्षा देण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले असल्याचे वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले आहे. ही सुरक्षा वाढवली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Web Title: Keshav Upadhye Criticized To Shiv Sena On Eknath Shinde Letter Mla Family Protection Take

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..