
"त्यात शरद पवारांचा..."; तृप्ती देसाईंनी केली केतकी चितळेची पाठराखण
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यासंदर्भात वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला (Ketaki Chitale) अटक करण्यात आली आहे. त्यानंतर राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं असून राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी तिच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रयत्नही केला. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी (Social Activist Trupti Desai) मात्र केतकीची पाठराखण केली आहे.
भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी केतकी चितळेच्या समर्थनार्थ एक पोस्ट लिहिली आहे. केतकीच्या पोस्टमध्ये शरद पवारांचं नाव कुठेही नाही, असा दावा त्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबुकवर एक पोस्टही लिहिली आहे.
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्या म्हणतात, "आपल्याकडे लोकशाही आहे, प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, तिने पोस्ट मध्ये लिहिलेल्या "पवार" या शब्दाने ते नक्की शरद पवारांविषयीच लिहिले आहे का? कारण व्यक्तीचे पूर्ण नाव लिहिलेले दिसत नाही. पवार साहेबांविषयी असे त्यांनी जाणून बुजून लिहिले असेल तर चुकीचेच आहे पण केतकी चितळेने जी पोस्ट केली आहे ती चुकीची वाटणाऱ्यांनी तिच्यावर कायदेशीर तक्रारी कराव्यात, तिच्याविषयी चुकीचे शब्द वापरून किंवा तिच्याविरोधात घाणेरडे ट्रोलिंग करून आपल्याला संस्कार नाहीत हे दाखवू नये."
हेही वाचा: केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात; पवारांवरील पोस्ट भोवली
टीव्ही अभिनेत्री केतकी चितळेने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. नितीन भावे नामक व्यक्तीच्या नावे तिने ही पोस्ट केली आहे. या मध्ये शरद पवार यांच्यावर हीन दर्जाची टीका करण्यात आली आहे. ऐंशी झाले,आता उरक, वाट पाहतोय नरक, अशा प्रकारची असंवेदनशील भाषाही वापरण्यात आली आहे. त्यामुळे केतकी चितळेवर कारवाई करण्यात आली आहे.
Web Title: Ketaki Chitale Trupti Desai Facebook Post About Sharad Pawar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..