Shraddha Murder Case: 'मेरा अबदुल ऐसा नही' केतकी चितळेची दिल्ली मर्डर प्रकरणावरील पोस्ट चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shraddha Murder Case

Shraddha Murder Case: 'मेरा अबदुल ऐसा नही' केतकी चितळेची दिल्ली मर्डर प्रकरणावरील पोस्ट चर्चेत

दिल्लीमध्ये झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. श्रद्धाचा बॉयफ्रेंड आफताब पूनावाला याने श्रद्धाची हत्या करून तिचे 35 तुकडे केले आणि ते फ्रिजमध्ये ठवले. श्रद्धाची काही महिन्यांपूर्वी हत्या करून आफताब मागच्या तीन आठवड्यांपासून श्रद्धांचे केलेले 35 तुकडे जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकत होता. या गोष्टीची माहिती मिळताच पोलिसांनी श्रद्धाचा बॉयफ्रेंड आफताब याला ताब्यात घेतलं. हे सर्व भयंकर कृत्य आफताबने चित्रपट आणि वेब सीरिज पाहून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान देशभरातून या प्रकरणाचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान अभिनेत्री केतकी चितळे हिने या घटनेवर आपल्या सोशल मिडियावर पोस्ट शेअर केली आहे. केतकीची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

Post

Post

श्रद्धासोबत जे झालं ते आणखी कोणासोबत होऊ नये या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये असंही केतकीने पोस्ट मध्ये म्हंटलं आहे. यासंदर्भात आपलं मत मांडत केतकीनं म्हटलं आहे की, 'मेरा अबदुल ऐसा नही. बरोबर आहे. कारण आप मेलं, जग बुडालं. पण 35 तुकडे होताना, गळा दाबला जाताना तरी कुठे तरी पश्चात्ताप होत असेल ना? कुटुंबियांची आता काय मानसिक स्थिती असेल तर विचार केल्यास अंगावर काटा येतोय. मुलींनो, तुम्ही शेवटचा श्वास घेताना डोळे उघडून पुन्हा ( यावेळी कायमचे) मिटणार आहात? का आता तरी निद्रा मोडणार आहात? #जागो मेरे देश' अशी पोस्ट लिहली आहे.

हेही वाचा: Shraddha Murder Case: लव्ह जिहादवरून राम कदम आक्रमक! श्रद्धाला न्याय मिळवून देण्यासाठी...

तर केतकी तिच्या दुसऱ्या पोस्टमध्ये म्हणते, 'सनातनी मुलांना तुम्हालाही सुधारण्याची गरज आहे. तुम्ही जोवर तुमच्या पोकळ पुरुषार्धावर प्रेम करत राहाल तोवर मुली अबदुल, आफताब, अहमदबरोबर दिसणार. कारण मुलींना पटवण्याबरोबर ते मुलींना अटेंशन देतात, मग मर्डर करतात. तुम्ही मुलींना आधी नाकारता आणि तिच्याकडून प्रेमाची अपेक्षा करता'.

केतकीने लिहिलेली पोस्ट अनेकांना विचार करायला भाग पाडते. केतकीने लिहलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. अनेकांनी केतकीच्या पोस्टचं समर्थन केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून केतकी चितळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल लिहलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत होती पण आजच्या पोस्टनंतर केतकीला लोक समर्थन देताना दिसत आहेत.

हेही वाचा: Shraddha Murder Case: श्रद्धाच्या वडिलांचा 'लव्ह जिहाद'चा संशय, म्हणाले...

टॅग्स :crimedelhi