Shraddha Murder Case: श्रद्धाच्या वडिलांचा 'लव्ह जिहाद'चा संशय, म्हणाले...

श्रद्धा वालेकर या मुंबईतल्या तरुणीच्या खून प्रकरणाने जगभरात खळबळ माजली
Shraddha Walekar
Shraddha WalekarEsakal

श्रद्धा वालेकर या मुंबईतल्या तरुणीच्या खून प्रकरणाने जगभरात खळबळ माजली आहे. तिचाच प्रियकर आफताब पुनावाला याने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते जंगलात टाकले आहेत. यासंदर्भात तिचे वडील विकास वालेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

श्रद्धा वालेकरच्या वडिलांनी आपल्या मुलीचा मारेकरी आफताब अमीन पूनावालाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाबाबत त्यांनी 'लव्ह जिहाद'ची शंका उपस्थित केली आहे. आफताबने त्याची लिव्ह इन पार्टनर श्रद्धा हिचे ३५ तुकडे करून निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर हे तुकडे जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले आहेत.

Shraddha Walekar
Shraddha Murder Case : घरात प्रेत ठेवून खरेदीला गेला; नंतर १६ दिवस विल्हेवाट लावत बसला! आरोपीची कबुली

श्रद्धाचे वडील विकास वालेकर म्हणाले, 'मला या प्रकरणात लव्ह जिहादचा संशय आहे. आम्ही आफताबला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहोत. माझा दिल्ली पोलिसांवर विश्वास आहे आणि तपास योग्य दिशेने सुरू आहे. श्रद्धा तिच्या काकांच्या खूप जवळ होती आणि माझ्याशी जास्त बोलली नाही. आफताबच्या संपर्कात मी कधीच आलो नाही. या प्रकरणाची पहिली तक्रार मी वसई, मुंबई येथे केली होती.

Shraddha Walekar
Shraddha Murder Case : 'ही' वेबसिरीज पाहून आफताबने प्रेयसीच्या देहाचे केले ३५ तुकडे

महाराष्ट्रातील पालघर येथे राहणाऱ्या विकास यांनी नोव्हेंबरमध्ये मुंबई पोलिसांकडे आपली मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. प्राथमिक तपासात श्रद्धाचे शेवटचे लोकेशन दिल्लीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे हे प्रकरण दिल्ली पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते. श्रद्धाच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या आफताबसोबतच्या नात्याबद्दल पोलिसांना सांगितले होते. श्रद्धाच्या बेपत्ता होण्यामागे आफताबचा हात असू शकतो, अशी भीती त्यांना होती.

Shraddha Walekar
Mehrauli Murder Case : प्रियकराने केली प्रेयसीची हत्या, शरीराचे केले अनेक तुकडे

श्रद्धाच्या वडिलांनी त्यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला. आफताबला कसे आवडत नाही आणि या नात्याला विरोध केला होता हे सांगितले. त्याने मुलीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती मानली नाही. जोपर्यंत जप्त झालेल्या अवयवांची डीएनए चाचणी होत नाही तोपर्यंत आफताबच्या हत्येचा आणि मुलीच्या मृत्यूच्या दाव्यांवर विश्वास ठेवत नाही, असेही विकास यांनी सांगितले आहे.

दरम्यान दिल्ली पोलीस आफताबच्या प्रोफाइलचा तपशील मिळविण्यासाठी बंबलला पत्र लिहू शकतात. श्रद्धाचे अवयव घरी असताना त्याच्या घरी त्याला भेटायला आलेल्या त्या महिलेची माहिती मिळवण्यासाठी पत्र लिहू शकतात. या हत्येमागे यापैकी कोणतीही महिला कारण असू शकते का, याची शक्यता पोलीस पाहत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com