

Overhead Wire Spark at Khandala Station
ESakal
मुंबई : राज्यभरात मुसळधार पावसाने थैमान घातले असून अनेक भागात दरड कोसळणे, पाणी साचणे आणि झाडे पडण्याच्या घटना घडत आहेत. परिणामी रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. नुकतेच भांडुप स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यानंतर खंडाळा रेल्वे स्थानकाजवळही ओव्हरहेड इलेक्ट्रिक (OHE) वायरवर झाड कोसळल्याची घटना घडली आहे.