एकनाथ शिंदे यांच्या बंडात खानदेशातील आमदार

शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी बंड केले आहे.
Eknath Shinde & Kishor Patil
Eknath Shinde & Kishor Patilesakal

जळगाव : शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह आमदारांनी बंड केले आहे. त्यात खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील चिमणराव पाटील व पाचोरा येथील किशोर पाटील असल्याचे सांगण्यात येत आहे. हे आमदार नॉट रिचेबल असल्याने त्यांनी बंड केल्याची चर्चा आहे.

पाचोरा येथील आमदार किशोर पाटील हे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांचे काका (स्व.) आर. ओ. तात्या पाटील हे कट्टर शिवसेना आमदार होते. त्यावेळी किशोर पाटील हे पोलिस कॉन्टेबल होते. मात्र आपला उत्तराधिकारी म्हणून त्यांनी आपली आमदारकीची जागा किशोर पाटील यांना दिली होती. पाटील यांनी आपल्या कर्तृत्वावर आमदारकीची छाप पाडली, जिल्हा बँकेतही ते उपाध्यक्ष होते. पाचोरा पालिकाही किशोर पाटील यांच्या ताब्यात आहे. पाटील हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे ते त्यांच्या समवेत बंडात असल्याचे सांगण्यात येत आहे.
चिमणराव पाटील पारोळा येथील शिवसेना आमदार आहेत. ज्येष्ठ आमदार असल्याने मंत्रिपदाचे दावेदार होते, मात्र गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे मंत्री झाल्याने त्यांची संधी हुकल्याने ते नाराज होते. अनेक वेळा शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्याशी त्यांचे उघड वादही झाले. त्यामुळेच ते फुटले असावे अशी चर्चा आहे.

Eknath Shinde & Kishor Patil
पाचोऱ्यातील मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुप्त भेटीला उजाळा
Eknath Shinde & Kishor Patil
PM मोदी तुकारामांच्या भेटीला आले अन् एकनाथाला घेऊन गेले : भुजबळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com