'याद राखा! कुणाच्या भाकरीवर टाच आणाल तर...'; किरण मानेंसाठी आव्हाड मैदानात | Jitendra Awhad on Kiran Mane | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kiran Mane and Jitendra Awhad

राजकीय भूमिका घेतल्यानं अभिनेता किरण माने यांना स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या मालिकेतून काढून टाकलं असून यावर आता सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

कुणाच्या भाकरीवर टाच आणाल तर..; किरण मानेंसाठी आव्हाड मैदानात

अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांनी राजकीय भूमिका घेतल्यामुळे स्टार प्रवाह (Star Pravah) या वाहिनीने 'मुलगी झाली हो' (Mulagi Zali Ho) मालिकेतून काढून टाकलं. यावर प्रतिक्रिया देताना किरण माने यांनी संताप व्यक्त केला. हा अभिनय क्षेत्रातील खून असल्याचं त्यांनी म्हटलं. ही झुंडशाही अशीच सुरु राहील, शिवबा - तुकोबांच्या आणि शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे घडलंय हे लक्षात ठेवा. ही झुंडशाही खपवून घेऊ नये. मला न्याया मिळाला तर या झुंडशाहीविरोधात बोलायला लोक पुढे येतील, काय करायचं ते ठऱवावं असंही त्यांनी सकाळशी बोलताना सांगितलं.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) यांनी ट्विटरवरून स्टार प्रवाह वाहिनीला इशारा दिला आहे. तुम्ही जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही असं आव्हाड यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारतो म्हणून मालिकेतून काढण्यात आलं. पण महाराष्ट्रात कलाकारांनी टीका केली तर त्यांच्या विचारांचा आदर, सन्मानच केला असल्यंचाही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

आव्हाड यांनी ट्विटरवर म्हटलं की, स्टार प्रवाहावरील “मुलगी झाली हो” या मालिकेतील विलास पाटील पात्र साकारणाऱ्या किरण माने या अभिनेत्यास फुले, शाहु, आंबेडकर विचारांची कास धरुन सोशल मिडीयावर लिहीतो, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारतो म्हणुन अचानक मालिकेतुल काढुन टाकले गेले. या महाराष्ट्रात दादा कोंडके, पु.ल.देशपांडे,निलु फुले या कलाकारांनी कधी टिका केली तरी त्यांच्या विचारांचा आदर करीत त्यांचा सन्मानच केला. याद राखा,हा महाराष्ट्र वैचारीक वारसा जोपासत तुमच्या विरोधात लिहीले म्हणुन तुम्ही जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही

हेही वाचा: "हा अभिनय क्षेत्रातील खून"; मालिकेतून काढल्याने अभिनेते किरण मानेंचा संताप

किरण माने यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, 'आम्ही दोन प्रेक्षक असले तरी प्रयोग करतो..' अशी माझी तिरकस पोस्ट् होती. त्या पोस्ट्बाबत यांनी लावून घेतलं की, हे आमच्या नेत्याला बोलले. म्हणून त्यांनी अक्षरश: स्टार प्रवाहच्या पेजवर कॅम्पेन चालवलं की यांना सिरियलमधून काढून टाकण्यात यावं.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top