किरण मानेंची मालिकेतून एक्झिट का? दिग्दर्शकाने सोडलं मौन | Kiran Mane | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kiran Mane

किरण मानेंची मालिकेतून एक्झिट का? दिग्दर्शकाने सोडलं मौन

मुंबई : अभिनेते किरण माने यांच्या विरोधात आता मालिकेतील कलाकार एकवटले आहेत. किरण माने यांच्या गैरवर्तणुकीमुळेच त्यांना मालिकेतून काढण्यात आले आहे. उगीच या प्रकरणाला राजकीय रंग देण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया मुलगी झाली होमधील कलाकार आणि दिग्दर्शक यांनी दिली आहे. दिग्दर्शक सचिन देव (Director Sachin Deo) म्हणाले, की अभिनेते किरण माने यांची सेटवरील वागणूक बरोबर नव्हती. (Kiran Mane )

त्यांना प्राॅडक्शन हाऊसकडून तीन वेळा समज देण्यात आली होती. तरीही त्यांनी आपली वागणूक सुधारली नाही. त्यामुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आले. कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली किंवा राजकीय मत सोशल मीडियावर मांडले म्हणून काढण्यात आलेले नाही.

हेही वाचा: कॅन्सरच्या रुग्णांना शहरी गरीब योजनेचा आधार

अभिनेत्री शर्वाणी पिल्ले म्हणाली, की किरण माने यांची बोलण्याची आणि वागण्याची पद्धत बरोबर नव्हती. आपल्यामुळेच ही मालिका चालते असा वारंवार टेंभा ते मिरवीत होते. त्यांच्या अशा गैरवर्तणुकीमुळेच त्यांना काढण्यात आले आहे. परंतु त्यांनी या गोष्टीला राजकीय रंग दिला आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनीही शर्वाणी पिल्ले आणि सचिन देव यांच्या प्रतिक्रियेला दुजोरा दिला आहे. किरण माने यांच्या गैरवर्तणुकीमुळेच त्यांना काढण्यात आले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai NewsMarathi Serial
loading image
go to top