उद्धव ठाकरे म्हणजे माफिया सेनेचे माफिया मुख्यमंत्री, सोमय्यांचा हल्लाबोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Political News

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात स्पर्धा सुरू आहे.

'उद्धव ठाकरे म्हणजे माफिया सेनेचे माफिया मुख्यमंत्री'

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात स्पर्धा सुरू आहे. दोघांमध्ये अधिक खोटं अधिक बोलतं यावरून ही स्पर्धा असून उद्धव ठाकरे हे माफिया सेनेचे माफिया मुख्यमंत्री आहेत, असा घणाघात भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. दापोलीतील साई रिसॉर्टचे मालक अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. (Konkan Political News)

किरीट सोमय्या यांनी पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांची कार्यालय येथे जाऊन भेट घेतली. या भेटीत दापोली साई रिसॉर्टचे मालक अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यासंदर्भात त्यांनी ही भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: ठाकरेंना मुख्यमंत्रीपद कळलंच नाही, निवडणूक आली की आमदारांना हॉटेलमध्ये कोंबतात

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे माफिया सेनेचे माफिया मुख्यमंत्री आहेत. साई रिसॉर्ट हे अनधिकृत असल्याने त्यावर कारवाई करावी, असे आदेश पर्यावरण मंत्रालय केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या संदर्भात आम्ही तीन वेळा दापोली पोलिस स्टेशन तसेच पोलिस अधीक्षक रत्नागिरी यांच्याकडे तक्रार केल्या आहेत.

पुढे ते म्हणाले, राज्य सरकारने रिसॉर्टसंदर्भात अहवाल दिला आहे. याचा एनए अनधिकृत असून फ्रॉड सर्जरी करून प्राप्त करण्यात आला आहे, अस या अहवालातून समोर आले आहे. आम्ही दापोलीतील दोन रिसॉर्ट मालकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. परंतु साई रिसॉर्टच्या मालकाविरुद्ध अजूनही तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे ताबडतोब याची दखल घेत तक्रार दाखल करु आणि कारवाई करावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

हेही वाचा: NCPला मुख्यमंत्रीपदाची आशा? मुंडेंच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

Web Title: Kirit Somaiya Criticised To Uddhav Thackeray And Anil Parab On Sai Resort Topic In Dapoli

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top