
खोटी वक्तव्य करुन फडणवीस इतिहास का बदलत आहेत?, पेडणेकरांचा सवाल
खोटे दावे करुन फडणवीसांनी प्रतिमा मलिन करु नये, पेडणेकरांचा सल्ला
बाबरी मशिदी पाडण्याची जबाबदारी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी घेतली होती. तेव्हा विरोधक का गप्प बसले होते. बाबरी पाडण्यासाठी शिवसेनेच्या महिलाही गेल्या होत्या. मात्र तेव्हा त्यांना गाडीतून उतरू दिले नाही. त्यामुळे बाबरी मशिद पाडण्यासंदर्भातील खोटे दावे सादर करून देवेंद्र फडणीसांनी प्रतिमा मलिन करण्याचं काम करु नये, असा पलटवार शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. खोटी वक्तव्य करुन फडणवीस इतिहास का बदलत आहेत? असा सवालही पेडणेकरांनी केला आहे. आज त्या मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
हेही वाचा: राज ठाकरे 'हिंदू जननायक' नाही, तर हिंदू मुस्लिम एकतेचे 'खलनायक'
यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल बाबरी मशिदीवरून केलेल्या वक्तव्याचा पेडणेकर यांनी समाचार घेतला. त्या म्हणाल्या, बाबरी पाडल्यानंतर सर्वांची पळता भुई थोडी झाली होती. यूपीतून रिपोर्ट बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासंदर्भातील त्यांचे मागचे सर्व अहवाल तपासण्याची आवश्यकता आहे. बाबरी पाडायला तुम्ही असालही मात्र शिवसेनेचेही नेते होते. त्यामुळे धनुष्यधारी शिवसेना बदलण्याची गरज नाही, असा सल्लाही पेडणेकर यांनी विरोधकांना दिला आहे. आमचे हिंदुत्व सगळीकडे दिसतं तुमच्या प्रश्नांनी काही होणार नाही. मात्र काहींना यातही केमिकल लोच्या झाल्याचे दिसते आहे, असं म्हणत त्यांनी मनसेला टोला लगावला आहे.
पुढे मनसेवर टीका करताना त्या म्हणाल्या, मनसैनिक हुशार झाले आहेत. दरम्यान, मशिदीवरील भोंगे काढायला सांगितले तर ते झालं नाही आणि म्हणतात आम्ही बाबरी पाडली. हिंदू कधी मशीद पाडूच शकत नाही. तो ढाचा होता ते पाडण्याचं काम आम्ही अभिमानानं केलं. तो ढाचा पाडताना देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी होता. याच राम मंदिरासाठी सेन्ट्रल जेलमध्ये मी १८ दिवस घालवले. आणि तुम्ही आम्हाला विचारता बाबरी पडली तेव्हा तुम्ही कुठे होता, असा सवाल काल देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यांच्या या प्रश्नाला आज पेडणेकर यांनी उत्तर दिले आहे.
हेही वाचा: गणेश नाईक उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता, अटकेची कारवाई होणार?
Web Title: Kishori Pednekar Reaction To Devendra Fadnavis On Babri Masjid Statement Shiv Sena Action Mode
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..