शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे! - आदिनाथ चव्हाण

पुणे  - अॅग्रोवन मार्ट पार्टनरच्या  प्रशिक्षण कार्यक्रमावेळी दीप प्रज्वलन करताना  एबी व्हिस्टा कंपनीचे दक्षिण आशियाचे संचालक  डॉ. दिनेश भोसले. शेजारी ‘अॅग्रोवन'चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण आणि अॅग्रोवन ॲग्रीटेक इंडस्ट्रीजचे सीईओ नीलेश शेजवळ.
पुणे  - अॅग्रोवन मार्ट पार्टनरच्या  प्रशिक्षण कार्यक्रमावेळी दीप प्रज्वलन करताना  एबी व्हिस्टा कंपनीचे दक्षिण आशियाचे संचालक  डॉ. दिनेश भोसले. शेजारी ‘अॅग्रोवन'चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण आणि अॅग्रोवन ॲग्रीटेक इंडस्ट्रीजचे सीईओ नीलेश शेजवळ.

पुणे - कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतीला सध्या सन्मान असल्याचे दिसत नाही. शेतकऱ्यांचे विविध पातळ्यांवर मोठ्या प्रमाणात शोषण होते आहे. पण शेतकरी समृद्ध झाला तरच देश श्रीमंत होईल, असे सांगतानाच ढाल, तलवारीने लढाईचे दिवस गेले असून, शेतीच्या उन्नतीसाठी आता ज्ञानाला महत्त्व देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांनी केले.

ॲग्रोवन मार्टच्या मार्ट पार्टनरसाठी २२  ते २४ फेब्रुवारी या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चव्हाण बोलत होते. तीन दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात दीपक फर्टीलायझरचे सहयोगी उपाध्यक्ष विजयराव पाटील, राहुरी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख, एबी व्हिस्टा कंपनीचे दक्षिण आशियाचे संचालक डॉ. दिनेश भोसले, ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, ॲग्रोवन ॲग्रीटेक इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश शेजवळ आदींनी मार्गदर्शन केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माणसं जोडा, जग जोडले जाईल
ॲग्रोवन मार्ट या प्रकल्पाचा आवाका आणि विस्तार खूप मोठा आहे. या प्रकल्पाशी संबंधित असलेल्या प्रत्येक घटकाबरोबरच मार्ट पार्टनरची जबाबदारीही मोठी आहे. ॲग्रोवन आणि शेतकरी यांच्यातील विश्वासाचे नाते ॲग्रोवन मार्टमुळे अधिक दृढ होईल असा विश्वास वाटतो, असे मत ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी मांडले. माणसं जोडत जा, जग तुमच्याशी आपोआप जोडले जाईल, असा सल्लाही त्यांनी दिला.

शेती बळकट झाल्यास सर्वच घटक समृद्ध होतील. शेती आणि शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी ॲग्रोवनने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. 
- डॉ. राजाराम देशमुख, माजी कुलगुरू, राहुरी कृषी विद्यापीठ 
 
देशात अनेक जण लखपती,करोडपती आहेत, मात्र यात शेतकरी दिसत नाही. त्यामुळे शेतकरी लखपती होण्यासाठी आपल्या सर्वांना काम करावे लागणार आहे.
- डॉ. दिनेश भोसले, दक्षिण आशियाचे संचालक, एबी व्हिस्टा कंपनी

आपण व्यवसायासाठी एकत्र आलो असलो तरी आपली वाटचाल सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून असायला पाहिजे. शेतकरी केंद्रबिंदू मानून, त्याला थेट फायदा मिळावा हे आपले उद्दीष्ट आहे. शेती अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी या प्रकल्पात सहभागी असलेल्या सर्व घटकांचे योगदान महत्वाचे आहे.
- नीलेश शेजवळ, सीईओ, ॲग्रोवन ॲग्रीटेक इंडस्ट्रीज

व्यवसाय यशस्वी करण्यासाठी प्रामाणिकपणा, सचोटी आणि प्रेम या गोष्टींची आवश्यकता असते. व्यवसाय करताना खचून न जाता, संयम, संवेदनशीलतेने काम करायला हवे.
- विजयराव पाटील, सहयोगी उपाध्यक्ष, दीपक फर्टीलायझर

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com