Gujarat Hapus mango GI recognition dispute
esakal
रत्नागिरी : कोकणचा हापूस आणि गुजरातचा वलसाड हापूस यांच्यातील भौगोलिक मानांकनाच्या (GI Tag) वादाला आता निर्णायक वळण मिळाले आहे. वलसाड हापूसला स्वतंत्र भौगोलिक मानांकन मिळावे, यासाठी गुजरातकडून करण्यात आलेल्या अर्जावर चेन्नई येथील GI रजिस्ट्रीमध्ये अंतिम सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंनी समाजाच्या व्यापक हिताचा विचार करून तडजोडीचा मार्ग स्वीकारावा आणि सामंजस्याने तोडगा (Gujarat Valsad Hapus separate GI tag application) काढावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना GI रजिस्ट्रीने केली आहे.