
राज्यातील महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत अनेकदा खोटे लाभार्थी असल्याचे प्रकार समोर आले होते. मात्र आता धक्कादायक अशी माहिती समोर आलीय. लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत १४ हजार पेक्षा जास्त पुरुषांनी लाभ घेतला आहे. १० महिने या पुरुषांना तब्बल २१.४४ कोटी रुपयांचं वाटपही झालं आहे. याबाबतचं वृत्त दैनिक लोकमतने दिलंय.