
Ladki Bahin Yojana Marathi News : लाडकी बहीण योजनेचे अर्ज छाननीमध्ये बाद होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यामुळं आत्तापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेल्या लाखो लाडक्या बहिणींना याचा फटका बसणार असल्याचंही बोललं जात आहे. यापार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.