

विधानसभा निवडणुकांपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहिण योजनेचा गाजावाजा केला. सरसकट सर्व महिलांचे अर्ज स्विकारण्यात आले. निवडणुका असल्यामुळे त्यावेळी सरकारला निकष तपासायला देखील वेळ मिळाला नसले, किंवा मत्ताधिक्य कमी होण्याची भिती सरकाराला असेल, असे आपण समजूया... त्यामुळे आता महायुती सत्तेत आल्यानंतर पुन्हा निकष तपासण्यात येणार आहेत, या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्राच्या अग्रलेखातून सरकारवर खोच टीका करण्यात आली आहे.