Ladki Bahin Yojana: राजकीय खेळी की प्रशासनाची चूक? निवडणूक आयोगाचा आदेश धाब्यावर! ‘लाडकी बहीण’चे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात
Election Commission Decision: राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहितेमुळे 'लाडकी बहिण' योजनेचा हप्ता देण्यापासून रोखले होते. मात्र लाभार्थींंच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे कारण देत राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी महाराष्ट्र सरकारला 'लाडकी बहिण' योजनेचा जानेवारीचा हप्ता आगाऊ देण्यापासून रोखले होते.