Ladki Bahin Yojana e-KYC OTP Error
esakal
गेल्या वर्षी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये देण्याचं सरकारने जाहीर केलं होतं. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती. मात्र आता अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला असल्याचं आता पुढे आले आहे. त्यामुळे सरकारने लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक केली आहे.