
Summary
चार लाख महिलांनी खोटे पत्ते देऊन लाडकी बहीण योजनेतून निधी लाटल्याचे उघड झाले.
आतापर्यंत २६ लाखांहून अधिक अर्ज बाद झाले असून अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी सुरु आहे.
नवीन नियमांनुसार एकाच घरातील वेगवेगळ्या रेशन कार्डवर असणाऱ्या महिलांनाही लाभ मिळणार आहे.
Ladki Bahin Yojana Fraud Exposed : लाडकी बहिण योजना लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेत अनेक महिलांनी निकष पूर्ण न करता या योजेनेच पैसे लाटल्याचे समोर आले असतानाचा आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता ४ लाख महिलांनी बोगस पत्ते देऊन पैसे लाटल्याचे पडताळणीत समोर आले आहे.