Ladki Bahin Yojana
esakal
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत जवळपास ८१ लाख महिला अपात्र ठरल्याचं पुढे आले आहे. त्यामुळे सरकारला जवळपास २४ हजार ३०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. त्यानंतर आता विविध चर्चाही सुरु झाल्या आहेत. खरं तर निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारने घाईगडबडीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली होती. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.