

Ladki Bahin Yojana check status online maharashtra
esakal
Maharashtra Ladki Bahin scheme update : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात प्रत्येकी १५०० रुपयांप्रमाणे एकूण ३००० रुपये जमा झाले असून, काही लाभार्थ्यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा न झाल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे आपला हप्ता बंद झाला आहे का, अशी शंका अनेक महिलांच्या मनात निर्माण झाली आहे. मात्र, लाभार्थी महिलांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने अर्जाची स्थिती तपासता येणार आहे.