
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची छाननी सुरू असून त्यात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. तब्बल १४ हजारांहून जास्त पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं आढळून आलंय. आता या लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत. अपात्र लाभार्थींची छाननी सुरू ठेवा, ज्या पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतलाय त्यांची चौकशी करा असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सांगितलं.