
Ladki Bahin Yojana Marathi News : विधानसभा निवडणुका तोंडावर असताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. पण आता निवडणुका पार पडल्यानंतर या योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अपात्र महिलांबाबत सरकारनं वारंवार परस्पर विरोधी भूमिका मांडल्या असल्यानं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. आता पुन्हा सरकारनं अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत, अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळं सरकारनं नेमका कसला खेळ चालवलाय असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.