

लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आहे. लाडक्या बहिणींना जानेवारीचा 1500 रुपयांचा हप्ता 26 जानेवारीनंतर दिला जाणार असला तरी 2100 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे, कारण महिला व बालविकास विभागाकडून राज्य सरकारकडे अस प्रस्तावच गेला नसल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे निवडणुकीआधी महायुतीने केलेल्या घोषणेप्रमाणे 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.