Fadnavis on July-August ₹3,000 Installment
esakal
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं असून, राज्यात महायुतीचं सरकार असेपर्यंत ही योजना बंद केली जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे दर महिन्याला मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर अवलंबून असलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.