जुलै महिना संपला तरी राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात या महिन्याचा हफ्ता जमा झालेला नव्हता. त्यामुळे जुलैचा हफ्ता येणार की नाही? अशी चर्चा महिलांमध्ये सुरू झाली असतानाच राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे. जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.