Ladki Bahin Yojana e-KYC Update 2026
esakal
Ladki Bahin Yojana ₹1500 payment date : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी राज्य सरकारने ३४४.६२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी महिला व बालविकास विभागाला वितरित करण्यास मान्यता देण्यात (Ladki Bahin Yojana e-KYC update 2026) आली असून, वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांच्या बँक खात्यांत प्रत्येकी १,५०० रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना हप्त्याची प्रतीक्षा संपण्याची आशा आहे.