Ladki Bahin Yojana
esakal
Ladki Bahin Yojana: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या योजनेचे हप्ते मिळण्यास विलंब होत असल्याचं दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर महिला आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. अशातच दिवाळी जवळ आल्याने दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळणार का, अशी चर्चा लाभार्थी महिलांमध्ये सुरू आहे.