Exclusion of Thousands of Women in Mumbai from Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली होती. मात्र, योजनेंतर्गत अनेक अपात्र महिलांनी अर्ज केल्याचं पुढे आलं आहे. या महिलांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशातच आता मुंबईतील २२ हजार महिलांना लाडक्या बहिणींच्या यादीतून वगळल्याचं पुढे आलं आहे.