Ladki Bahin Yojana
sakal
Summary
एकनाथ शिंदे यांनी अफवा फेटाळल्या आणि महिलांना खात्री दिली की योजना सुरूच राहील.
लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे.
दिवाळीचा हप्ता लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Ladki Bahin Yojana News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कधीच बंद होणार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ठामपणे सांगितले असतानाच कॉंग्रेस नेते विजय वट्टेटीवार यांनी ही योजना महायुती सरकार लवकरच बंद करणार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आधीच केवायसी आणि अपात्रतेची टांगती तलवार असणाऱ्या लाडक्या बहिणींची धाकधूक आणखी वाढली आहे.