महाराष्ट्र बातम्या
Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी, या तारखे पासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, मोठी अपडेट आली समोर!
Mumbai राज्य सरकारने त्यांना नोव्हेंबरअखेरचा लाभ विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वीच दिला.
महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. तीन महिन्यांतच सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख महिलांसह राज्यातील अडीच कोटी महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आणि राज्य सरकारने त्यांना नोव्हेंबरअखेरचा लाभ विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वीच दिला.
निवडणुकीत त्यांनी लाडक्या बहिणींना २,१०० रुपये देण्याची ग्वाही दिली. याचा मोठा फायदा महायुती सरकारला झाला. याची अंमलबजावणी आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर २१ एप्रिलपासून होण्याची शक्यता आहे.