रिक्षाचालकाची आत्महत्या; "लाल बावटा'ने केली मागणी : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून "एवढ्या' लाखांची करा मदत 

श्रीनिवास दुध्याल 
Wednesday, 15 July 2020

रिक्षाचालकाला आत्महत्या करण्यापूर्वी मदत करावी. वेळीच मदत न केल्यास रिक्षाचालकांनाही शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करावी लागते की काय, अशी भीती व्यक्त केली होती. ती आज खरी ठरून राजेश निकम या रिक्षाचालकाने आर्थिक ओढाताण सहन न झाल्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. भविष्यात आणखी रिक्षाचालकाच्या आत्महत्यांची वाट न बघता लवकरात लवकर रिक्षाचालकाना आर्थिक मदत व त्यांच्या वाहन कर्जावरील व्याज माफ करावी. तत्काळ निर्णय घेऊन रिक्षाचालकाना सहकार्य करावे, अशी मागणी लाल बावटा रिक्षा चालक संघटनेचे सोलापूरचे अध्यक्ष तथा माजी आमदार नरसय्या आडम व जनरल सेक्रेटरी सलीम मुल्ला यांनी केली आहे. 

सोलापूर : लॉकडाउनमुळे 72 दिवस रिक्षाचालकांना व्यवसायाअभावी आर्थिक संकटात सामोरे जावे लागले. कुटुंबीयांची उपासमार झाली. रिक्षाचालकांनाही शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या कराव्या लागतील की काय, अशी भीती व्यक्त केली होती, ती आज खरी ठरत आहे. शहरात भाड्याची रिक्षा घेऊन व्यवसाय करणारा राजेश निकम (वय 48, रा. सुशीलनगर, डीटीएड कॉलेजजवळ, विजयपूर रोड) या रिक्षाचालकाने आर्थिक ओढाताण सहन न झाल्याने व पुन्हा लॉकडाउन घोषित झाल्यामुळे, आता पुढे कसं जगायचं? कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या विवंचनेत गळफास लावून आत्महत्या केली आहे. मृत सुभाष निकम याच्या निधनामुळे त्याचे कुटुंब पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाले आहे. निकम कुटुंबाला आधार देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून 10 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी लाल बावटा रिक्षा चालक संघटनेने मुख्यमंत्री, परिवहनमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन आयुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. 

हेही वाचा : पंढरपूरच्या प्राध्यापकांची कौतुकास्पद कामगिरी : कोरोनाला रोखण्यासाठी बनवले "डिस्टन्स अलर्ट डिव्हाईस'..! 

निवेदनात म्हटले, की मार्च महिन्यापासून 72 दिवसांच्या लॉकडाउनमध्ये प्रवासी वाहतुकीवर अनेक निर्बंध आले. दैनंदिन उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रिक्षाचालकांना उपासमारीस सामोरे जावे लागले. बेरोजगारांनी स्वयंरोजगार म्हणून रिक्षा चालविण्याचा व्यवसाय सुरू केला. शासनाच्या नियम, अटी व शर्तीनुसार हजारो रुपयांचा महसूल भरला. आजही मोटार वाहन कायद्यानुसार नूतनीकरणासाठी वार्षिक हजारो रुपये रिक्षाचालक शासनास अदा करत असतात. कोरोना महामारीत अचानकपणे आलेल्या संकटात रिक्षाचालकांना उदरनिर्वाहाकरिता आर्थिक मदत देण्याची मागणी लाल बावटा रिक्षा चालक संघटनेने शासनाकडे केली होती. वाहन कर्जावरील व्याज माफ, दहा हजार रुपयांची आर्थिक मदत, अन्नधान्याची मदत देण्याबाबत पंतप्रधान, केंद्रीय परिवहनमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहनमंत्री, राज्य परिवहन आयुक्त, परिवहन सचिव, प्रादेशिक परिवहन अधिकारी व जिल्हाधिकारी यांना ई-मेलद्वारे जवळपास 29 निवेदने सादर केली. 

हेही वाचा : चहापेक्षा किटली गरम ! शहरातील उद्योगांना मिळाली सशर्त परवानगी; पण उद्योजक म्हणतात... 

एका निवेदनामध्ये संघटनेने नमूद केले होते, की रिक्षाचालकाला आत्महत्या करण्यापूर्वी मदत करावी. वेळीच मदत न केल्यास रिक्षाचालकांनाही शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करावी लागते की काय, अशी भीती व्यक्त केली होती. ती आज खरी ठरून राजेश निकम या रिक्षाचालकाने आर्थिक ओढाताण सहन न झाल्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. भविष्यात आणखी रिक्षाचालकाच्या आत्महत्यांची वाट न बघता लवकरात लवकर रिक्षाचालकाना आर्थिक मदत व त्यांच्या वाहन कर्जावरील व्याज माफ करावी. तत्काळ निर्णय घेऊन रिक्षाचालकाना सहकार्य करावे, अशी मागणी लाल बावटा रिक्षा चालक संघटनेचे सोलापूरचे अध्यक्ष तथा माजी आमदार नरसय्या आडम व जनरल सेक्रेटरी सलीम मुल्ला यांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Lal Bawta Rickshaw Drivers Association has demanded financial help for the family of the rickshaw puller who committed suicide