

Shaktipeeth Highway Opposition kolhapur
esakal
Shaktipeeth Highway Land Survey : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाची व्याप्ती राज्यभर वाढविण्याचा निर्धार १३ जिल्ह्यांतील शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मराठवाडा आणि विदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यांतून आंदोलनाची सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमिनीची मोजणी करू देणार नसल्याची भूमिका यावेळी घेण्यात आली.