परमबीर सिंहांना लास्ट वॉर्निंग; ...अन्यथा अटक वॉरंट निघणार

parambir singh
parambir singhesakal

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir singh) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मागील प्रत्येक सुनावनीस माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह हे उपस्थित राहत नाहीत. मात्र आज परमबीर यांना आयोगाकडून उपस्थित राहण्याची ही शेवटची संधी आहे.

आयोगाकडून ही शेवटची संधी

परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटी रूपयांची खंडणी वसूल करण्याचा आरोप केला होता. त्या आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या चांदीवाल आयोगाने सिंह यांना वारंवार समन्स बजावलं. पण, सिंह एकाही समन्सनंतर चौकशी समितीसमोर हजर राहीले नाहीत. या प्रकरणाची चौकशी आज (ता.१८) होणार असून आज परमबीर सिंह उपस्थित न राहिल्यास त्यांच्या विरोधात चांदिवाल आयोगाकडून अटक वारंट निघू शकतो. तसेच आज परमबीर यांना आयोगाकडून उपस्थित राहण्याची ही शेवटची संधी आहे.

हायकोर्टात याचिका दाखल

अँटलिया स्फोटकं प्रकरणानंतर राज्य सरकारने सिंह यांची तडकाफडकी बदली केली. त्यानंतर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून देशमुखांवर आरोप केले होते. या आरोपांच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकारने 30 मार्चला मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलाश चांदीवाल यांची नियुक्ती केली. चांदीवाल कमिशनने चौकशी सुरू केल्यापासून परमबीर सिंह वैद्यकीय कारणांमुळे रजेवर आहेत. चौकशी समितीसमोर उपस्थित न राहिल्यामुळे सिंह यांना 50 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. सिंह यांनी दंडाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केल्याची माहिती आहे. परमबीर सिंह यांनी राज्य सरकारने चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगावर प्रश्न उपस्थित करत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

parambir singh
हॉटेल्स, दुकानं खुली ठेवण्याची वेळ वाढवणार? आज महत्त्वाची बैठक

निकटवर्तीय संजय पुनुमिया यांच्याविरोधात गुन्हा

सिन्नरमध्ये बनावट कागदपत्रं सादर करून कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याप्रकरणी परमबीर सिंह यांचे निकटवर्तीय संजय पुनुमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुनुमिया यांनी समृद्धी महामार्गालगत जमिनी लाटल्याचा संशय आहे आणि या जमीन खरेदीशी परमबीर सिंह यांचा काही संबंध आहे का? याचा तपास पोलीस करणार आहेत. संजय पुनुमिया सध्या ठाणे पोलिसांच्या ताब्यात आहेत. सिन्नर पोलीस त्यांचा ताबा घेऊन जमीन खरेदी व्यवहारांची चौकशी करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com