Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Latest Maharashtra Politics News: देश-विदेश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तुम्हाला एकाच ठिकाणी वाचायला मिळतील.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Sakal

उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात सभा

उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात सभा होणार आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात पोहोचले आहेत. त्यांनी सभेच्या ठिकाणाची पाहाणी केली. कोल्हापुरातील तपोवन मैदानीत मोदी यांची सभा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

अनमोल बिश्नोईच्या धाकट्या भावाविरुद्ध लूक आऊट नोटीस

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई याच्याविरुद्ध पोलिसांनी लूक आऊट नोटीस काढली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खचली, ३० घरांचे नुकसान

जम्मू-काश्मीर येथील रामबन येथे गुरुवारी रात्रीपासून जमीन खचत आहे. रामबनपासून 6 किमी अंतरावर असलेल्या पेरनोट गावात 30 घरांचे नुकसान झाले आहे.

शिवसंग्रामची उद्या पुण्यात बैठक; ज्योती मेटे भूमिका जाहीर करणार

शिवसंग्राम संघटना लोकसभा निवडणुकीत महायुतीला की महाविकास आघाडीला पाठींबा देणार हे उद्या पुण्यात होणाऱ्या बैठकीत स्पष्ट होणार आहे. ज्योती मेटे यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.

नांदेडमध्ये मालाबार ज्वेलर्सच्या शोरुमला मोठी आग

नांदेडमधील मालाबार ज्वेलर्सच्या शोरुमला मोठी आग लागली आहे. या आगीत मोठी हानी झाल्याचं सांगितलं जात आहे.

नसिम खान यांचा काँग्रेसच्या स्टार प्रचारकपदाचा राजीनामा

नसिम खान यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईत मुस्लिम उमेदवार न दिल्यानं नसीम खान यांनी सकाळी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी आज आपल्या स्टार प्रचारपदाचा राजीनामा दिला.

हनुमान चालिसा प्रकरणी नवनीत राणांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठण प्रकरणी नवनीत राणांविरोधात मुंबईच्या स्थानिक कोर्टात सुनावणी सुरु आहे. ९ मे रोजी याप्रकरणी सुनावणी होणार असल्यानं या सुनावणीला राणांनी हजर रहावं असे आदेश मुंबई सत्र न्यायालयानं दिले आहेत.

केरळच्या थ्रिसरमध्ये मतदान संपलं; ईव्हीएम, व्हिव्हिपॅट केले सील

१९ वर्षीय पाकिस्तानी तरुणीवर चेन्नईत यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

तामिळनाडू : पाकिस्तानातील कराची येथील आयेशा रशीद या १९ वर्षीय तरुणीवर चेन्नईमध्ये यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आले.

नांदेडमध्ये ईव्हीएम मशीन कुऱ्हाडीने फोडलं; पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात

महाराष्ट्रात आठ मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. यादरम्यान नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील रामतिर्थ गावात एका तरुणाने कुऱ्हाडीने इव्हीएम मशीन फोडल्याचा प्रकार समोर आला आहे . यानंतर पोलीसांनी तत्काळ या तरुणाला ताब्यात घेतले आहे.

रवी किशन यांची DNA टेस्ट करण्याची मागणी मुंबई कोर्टाने फेटळाली

मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयाने भाजप खासदार आणि अभिनेते रवी किशन यांची मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीची डीएनए चाचणी करण्याची मागणी फेटाळली आहे.

अभिनेते प्रकाश राज यांनी बजावला मतदानाचा  हक्क; म्हणाले...

बंगळुरूमध्ये मतदान केल्यानंतर, अभिनेते प्रकाश राज म्हणाले, "माझे मत माझ्या हक्कांसाठी आहे, माझे प्रतिनिधित्व कोण करेल? संसदेत माझा आवाज कोण असेल? हे निवडण्याच्या माझ्या अधिकारासाठी आहे. उमेदवार निवडणे खूप महत्वाचे आहे. ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे आणि मी ज्या उमेदवारावर विश्वास ठेवला आहे आणि त्यांनी आणलेल्या जाहीरनाम्यासाठी आणि बदलासाठी मी मतदान केले आहे."

सेलिब्रिटींनीही मतदानाचा बजावला हक्क

अभिनेता अंकुर वाढवेनं बजावला मतदानाचा हक्क, मतदान केंद्र क्रं. १५३, सिंचन उपविभाग कार्यालय, पाटबंधारे विभाग, वाशिम रोड, पुसद

Ankur Wadhave
Ankur Wadhaveesakal

Sambhajinagar: धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 14 जण जखमी

धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोड जवळ मुरमा फाट्यावर हायवा ट्रकने रिक्षाला धडक दिल्याने 14 जण जखमी

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल प्रचाराच्या मैदानात

दिल्ली सरकारचे मंत्री आणि आपच्या नेत्या आतिशी म्हणाल्या की, "भाजप शासित केंद्र सरकार आणि त्यांचे राजकीय हत्यार ईडीने लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक केली जेणेकरून ते लोकसभा निवडणुकीत प्रचार करू शकत नाहीत. पण मी भाजपला सांगतो की मी. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात दिल्लीतील लोक, पंजाब आणि देशभरातील लोक निदर्शने करत असल्याने त्यांच्या या निर्णयाचा उलटा परिणाम झाला आहे. उद्यापासून म्हणजेच 27 एप्रिलपासून अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल प्रचार करणार आहेत."

Rahul Gandhi: युती सरकार भारतातील प्रत्येक बेरोजगार पदवीधरांना अप्रेंटिसशिप  शिक्षणाचा अधिकार देणार

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, "तरुण रस्त्यावर, देशातील प्रत्येक गावात हात जोडून रोजगार मागत फिरत आहेत. त्यांना रोजगार मिळत नाही. श्रीमंत कुटुंबातील लोक त्यांच्या मुलांना अप्रेंटिसशिप देतात, त्यांना 1 वर्षासाठी नोकरी मिळवून देतात. पण ही सुविधा भारतातील बेरोजगार तरुणांसाठी उपलब्ध नाही. भारतातील युती सरकार हे जगातील पहिले सरकार असेल जे भारतातील प्रत्येक बेरोजगार पदवीधरांना अप्रेंटिसशिप  शिक्षणाचा अधिकार देणार आहे”

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या घरी समन्वयकांची बैठक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या घरी समन्वयकांची बैठक घेण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी समन्वयकांची बैठक सुरू आहे. आमदार राजू पाटील, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील 62 जणांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह

महाराष्ट्र पोलिस दलात विविध प्रवर्गात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उत्तर महाराष्ट्रातील ६२ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिनी पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये नाशिकच्या ३५, जळगाव ११, धुळे १०, तर नंदुरबार जिल्ह्यातील ६ जणांचा समावेश आहे.

पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच

पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोयता गँगची दहशत दिसून येत आहे. पुणे शहर परिसरात अनेकदा कोयता गँगने गाड्या फोडल्याची भरदिवसा कोयत्याने वार करण्याची प्रकरणे ताजी असताना आणखी एक घटना समोर आली आहे. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात कोयत्याने अनेक दुचाकी, रिक्षा यांचे नुकसान केल्याची घटना समोर आली आहे.

मध्यरेल्वेवर १२ अनारक्षित उन्हाळी विशेष ट्रेन!

उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दादर-गोरखपूर, एलटीटी-गोरखपूर आणि सीएसएमटी- दानापूर दरम्यान अतिरिक्त बारा अनारक्षित उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 11 वाजतापर्यंत 18.01 टक्के मतदान

यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 11 वाजतापर्यंत 18.01 टक्के मतदान झाले आहे.

सकाळी 7 ते 11 वाजता दरम्यान विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान

दिग्रस : 20.22

कारंजा : 27.22

पुसद : 18.69

राळेगाव : 20.85

वाशिम : 20.26

यवतमाळ : 11.56

Congress leader Jairam Ramesh: आमचा कोणताही छुपा अजेंडा नाही; जयराम रमेश यांनी केलं स्पष्ट

आमचा कोणताही छुपा अजेंडा नाही, आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही जाहीरनाम्यात लिहिलं आहे. मोदी यांचाच धुव्रिकरणाचा अजेंडा आहे, असं म्हणत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

निवडणुक आयोगाला सुप्रिम कोर्टाचा मोठा दिलासा

सुप्रिम कोर्टाने पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घ्याव ही मागणी फेटाळली आहे. VVPAT पत्रिकांची मतमोजनी ही याचिका देखील कोर्टाने फेटाळली आहे. हा निवडणुक आयोगासाठी दिलासा आहे.

Loksabha Election: सकाळी 10 वाजेपर्यंत महाराष्ट्रात झाले सर्वात कमी मतदान

New Delhi: देशात दुसऱ्या टप्प्याच्या 88 जागेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाले आहे.

आसाम: 9.71 टक्के

बिहार: 9.84 टक्के

छत्तीसगढ: 15.42 टक्के

जम्मू आणि कश्मीर: 10.39 टक्के

कर्नाटक: 9.21 टक्के

केरळ: 11.98 टक्के

मध्यप्रदेश: 13.82 टक्के

महाराष्ट्र: 7.45 टक्के

कोकण रेल्वेमार्गावर २९० उन्हाळी विशेष फेऱ्या

उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू झाल्यामुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्यरेल्वे प्रशासनाने आतापर्यंत उन्हाळी स्पेशलच्या २९० फेऱ्या जाहीर केल्या आहेत.

 India Meteorological Department (IMD):  आज तापमान स्थिती असणार साधारण- IMD

आज लोकसभा निवडणुकीचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. आज दिवसभर तापमानाची स्थिती साधारण राहिली अशी माहिती आयएमडीने दिल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. आयोगाकडून मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Narayan Rane: नारायण राणे यांच्यासाठी आज देवेंद्र फडणवीस यांची सभा

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी आज (ता. २६) दुपारी १२ वाजता राजापूरमधून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राजापूर येथे राजीव गांधी मैदानावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार शेखर निकम, प्रमोद जठार, बाळ माने यांच्यासह महायुतीचे अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले आहे.

BJP national president JP Nadda: काँग्रेस SC, ST आणि OBC चा द्वेष करते; नड्डा यांची टीका

काँग्रेसने कायमच एसी, एसटी आणि ओबीसींचा हक्क हिरावून तो मुस्लिमांना दिला आहे. काँग्रेसने या सर्वांचा द्वेषच केला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी मुस्लिमांबाबत केलेलं वक्तव्य जाणूनबुजून केलं होतं, असं भाजप अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले.

Arvind Kejriwal: केजरीवाल यांच्या चेकअपसाठी ५ डॉक्टरांचे मेडिकल बोर्ड

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या रेग्युलर चेकअपसाठी पाच एम्स डॉक्टरांचे मेडिकल बोर्ड असणार आहे. कोर्टाच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Salman Khan residence firing case: सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी आणखी दोघांना अटक

बॉलिवूड स्टार सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी एनआयएने शूटर विक्की गुप्ता आणि सागर पाल यांची चौकशी केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

आज देशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. देशातील ८८ तर राज्यातील ८ मतदारसंघात मतदान पार पडत आहे. याशिवाय देश-विदेश आणि राज्यात विविध घडामोडी घडत आहेत. अशा बातम्यांच्या अपडेट्स तुम्हाला याठिकाणी वाचायला मिळतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com