सोशल मिडीयावरील 'या' डिपीमागचे सत्य काय?

टीम-ई-सकाळ
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

दोन वर्षापूर्वी फेसबुकवर एक देव गायकवाड नावाचे प्रकरण घडले होते. भाजप सरकारविरोधात या देव गायकवाड नावाच्या अकाउंटवरुन अनेक आरोप करण्यात आले होते.

पुणे : फेसबुक किंवा ट्विटरवर अनेकदा ब्लॅक ॲण्ड व्हाईट स्केचचा फोटो अनेकांनी स्वतःचा प्रोफाइल फोटो ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो. अनेकांना हा प्रश्न पडला असेल की हा फोटो कुणाचा? याची पार्श्वभूमी काय की हा फोटो अनेक तरुणांचा डीपी असतो. याची पार्श्वभूमी पाहिल्यास दोन वर्षापूर्वी फेसबुकवर एक देव गायकवाड नावाचे प्रकरण घडले होते. भाजप सरकारविरोधात या देव गायकवाड नावाच्या अकाउंटवरुन अनेक आरोप करण्यात आले होते.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

परखडपणे निर्भीड आणि रोखठोक मांडणीमुळे हे देव गायकवाड फेसबुक अकाउंट अल्पावधीतच मोठ्या प्रसिद्धीस आले. याप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या OSD निधी कामदार यांनी दोन वर्षापूर्वी या देव गायकवाड या फेसबुकविरोधात पोलिस तक्रार केली होती. त्यानंतर महादेव बालगुडे या तरुणाला अटक करण्यात आली. तद्नंतर जामीनावर सुटका झालेल्या महादेव बालगुडे या तरुणाने भाजप सरकारविरोधात सोशल मिडीयावर लिखाण सुरु ठेवले. 

किमान समान कार्यक्रमात उद्योग आणि रोजगारांसाठी 'मोठी घोषणा

महादेव बालगुडे या तरुणानेही हाच प्रोफाईल ठेवून भाजपविरोधात शासकीय कागदपत्रे, बातम्यांची कात्रणे आणि शासकीय वेवसाईटवरील अनेक दावे पुराव्यानिशी खोडून काढले. याचा परिणाम असा झाला की शासकीय वेबसाईट आणि ट्विटरवरुन सरकारला अनेकदा मजकूर हटवावा लागला. याच कारणामुळे फेसबुकवरील अनेकजण सदरचा प्रोफाइल फोटो ठेवलेल्या महादेव बालगुडे या अकाउंटला फॉलो करतात. म्हणूनच भाजप सरकारच्या विरोधात लिहणाऱ्या अकाउंटचा हा फोटो तरुण प्रोफाईल फोटो म्हणून ठेवलेले आपल्याला पाहायला मिळतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahadev Balgude and Dev Gaikwad Sketch Profile Photo viral on Social Media