राज्यभरातील जीवघेण्या अपघातांमध्ये मृत्यूसंख्येत वाढ; वाचा सविस्तर आकडेवारी

2019 च्या तुलनेत एकूण अपघातांमध्ये 13 टक्काने घट
Accident
Accidentsakal media

मुंबई : कोरोनाच्या महामारीमुळे (corona pandemic) गेल्या दोन वर्षात अपघात आणि अपघाती मृत्यूचा आकडा (people death in accident) घसरला होता. मात्र आता यावर्षी गेल्या दोन वर्षात दहा महिन्यात झालेले अपघात आणि मृत्यूच्या संख्येपेक्षा 3 टक्याने वाढ (Death rate increases) झाली आहे. यावर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात 10 हजार 5 जीवघेण्या अपघातांमध्ये 10 हजार 780 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 2019च्या तुलनेत यावर्षी एकूण अपघातांच्या आकडेवारीत मात्र 13 टक्याने घट झाल्याचा दावा महामार्ग पोलिसांनी (Highway police) केला आहे.

Accident
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे महिला उद्योजकता धोरण जाहीर; वाचा सविस्तर

गेल्यावर्षी याच दहा महिन्यात 8235 जीवघेण्या अपघातांमध्ये 8850 मृत्यू झाले होते. तर 2019 मध्ये 9699 जीवघेण्या अपघातांमध्ये 10 हजार 509 मृत्यू झाले होते. यातुलनेत यावर्षी जीवघेणे अपघात आणि त्यातील मृत्यू सुद्धा वाढले आहे. मात्र, दुसरीकडे गंभीर अपघात, गंभीर जखमींची संख्या, किरकोळ अपघात, किरकोळ जखमी आणि विना जखमी झालेल्या अपघातांच्या प्रकरणामध्ये गेल्या 2019 च्या तुलनेत घट झाल्याचा दावा केला जात आहे.

राज्यभरातील राज्यातील महामार्ग आणि रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात ब्लॅक स्पॉट आहे. त्याची दुरुस्ती आणि चालकांच्या बेजबाबदारणामुळे वाहन चालवत असल्यानेच अपघातांमध्ये वाढ झाले असून, रस्त्यांवर वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर कारवाई केल्यानेही वाहतुकदारांमध्ये सुधारणा होत नसल्याने अपघातांच्या संख्येत भविष्यातही वाढ होण्याची शक्यता आहे.

वर्ष - जीवघेणे अपघात/मृत्यू- गंभीर अपघात/जखमी - किरकोळ अपघात/जखमी - एकूण अपघात

जानेवारी-ऑक्टोबर 2019 - 9699/10609 - 10063/15873 - 4576/7966 - 27273

जानेवारी-ऑक्टोबर 2020 - 8235/8850 - 6989/10766 - 2658/4554 - 19164

जानेवारी-ऑक्टोबर 2021 - 10005/10780 - 8693/12681 - 3222/5573 - 23621

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com