INSIDE STORY : आपल्या महाराष्ट्रातील 'ही' आहेत प्रसिध्द फळं...

INSIDE STORY : आपल्या महाराष्ट्रातील 'ही' आहेत प्रसिध्द फळं...

लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाचा कोणतं ना कोणतं फळ खायला आवडतचं. आपल्याला एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, मॉल्स, मार्केटमध्ये आणि कोणत्याही चौकाचौकातील सिग्नलवर फळं विकणारे विक्रेते दिसतात. तसेच देवदेवतांची पूजा आणि घरात कोणी आजारी व्यक्ती असेल तेव्हा फळांचा वापर मोठ्या प्रमाणात करताना पाहायला मिळतो. त्यातील महाराष्ट्रातील राज्यवृक्ष म्हणून ओळखला जाणारा फळांचा राजा ‘आंबा’. अनेक खाद्यपदार्थामध्ये तसेच विविध आईस्क्रीम्स, मिल्क शेक्स, चॉकलेट बनवण्यासाठी लागणारी महाबळेश्‍वरमाधहल्या स्ट्रॉबेरीची ओळख. स्वयंपाकातील एक अविभाज्य घटक असलेला नारळ, नारळाचा जिल्हा म्हणून रत्नागिरीची असलेली ओळख. तर गोड शिरा, दुधाच्या खिरीत तसेच बिर्याणीत वापरण्यात येतो तो सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा काजू. बाहेरुन काटेरी आणि आतून गोड असलेला फणस. जगभरातील खवय्यांना वेड लावणारा हापूस आंबा. देशातल्या प्रमुख बाजारपेठेत मिरवत मानाचे स्थान मिळवलेले बोरं. अशा एक ना अनेक फळांची वैशिष्टये आपल्याला पाहायला मिळतात.

महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातील फळांची ओळख, माहिती, फळांचे गुणधर्म आणि निरोगी राहण्यासाठी फळांचे सेवन कितीपत उपयुक्त ठरते. ते सर्व पाहण्यासाठी चला तर मग जाणून घेवूया आपल्या महाराष्ट्रातल्या प्रसिध्द फळांची माहिती.  

याबाबत बोलताना डॉ. स्नेहल गायकवाड म्हणाल्या की, आपल्या सुदृढ आरोग्यासाठी प्रत्येकाने रोज एकतरी फळ खाल्लंच पाहिजे. फळं खाल्ल्याने आरोग्य उत्तम राहते. फळं नियमित खाल्यास पचनक्रिया सुधारते. शरीर संवर्धन व निरोगी आयुष्य जगण्यासाठी ज्या-त्या हंगामानुसार त्या त्या फळांचे सेवन प्रत्येकांनी केलंच पाहिजे. 

संत्री
नागपूर शहर हे संत्र्यांसाठी प्रसिध्द आहे. महाराष्ट्रातील नागपूर आणि अमरावती येथे संत्र्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. नागपुरी संत्री सर्वाच्याच आवडीचा विषय. संत्र्यांमध्ये पाण्याचे प्रमाण त्याचबरोबर व्हिटॅमिन C देखील मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे शरीरातील पाण्याचा समतोल राखण्याचं काम संत्री करतात. 

द्राक्षे
महाराष्ट्रातील नाशिक शहर हे द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे. नाशिक, सांगली, पुणे, सातारा आणि जळगाव येथे द्राक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड केली होते. शरीर संवर्धन व निरोगी आयुष्य जगण्यासाठी द्राक्षांचे सेवन करणे खूप उपयोगी ठरते.  

चिकू
महाराष्ट्रातील घोलवड, डहाणू आणि ठाणे या शहरात चिकूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. तसेच पुणे, कोकण, खान्देश याठिकाणीही चिकूची लागवड केली जाते. चिकू हे फळ त्याच्या गोड चवीमुळे सर्वाचेच आवडते आहे. चिकूची फळे ही गोलाकार आणि लंबगोलाकार अशा दोन प्रकारात असतात. चिकू फळाचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत. या गुणधर्मामुळे थकलेल्या, दमलेल्या, अशक्त झालेल्या निरुत्साही व्यक्तीस चिकूचे सेवन हे अमृतासमान ठरते. 

सिताफळ
महाराष्ट्रातील दौलताबाद (औरंगाबाद) येथे सिताफळ लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच बीड, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, नाशिक, पुणे, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यातही सिताफळाची लागवड केली जाते. सीताफळ हे बाहेरुन थोडं कडक पण आतून नरम आणि खायला गोड असणारं हे फळ अनेकांना आवडतो.  सिताफळ नियमित खाल्यास पचनक्रिया सुधारते. शरीरात रक्ताची योग्य पातळी राखण्यास मदत होते. मधुमेह आणि कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी सीताफळ खूप फायदेशीर आहे.

मोठी बातमी - राज ठाकरेंच्या कृष्णकुंजवर आज आनंदाचा दिवस, जाणून घ्या कारण 
 
केळी
महाराष्ट्रात ‘केळ्यांची राजधानी’ म्हणून जळगाव शहर प्रसिद्ध आहे. जळगाव आणि वसई येथे केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. बहुतांशवेळा केळी वजन वाढवते म्हणून किंवा मधुमेह असल्याकारणाने खाणे टाळले जाते. पण केळ्यामध्ये असणारे फायबर हे त्यातील नैसर्गिक साखर सावकाशपणे रक्तात शोषण्यास मदत करतात.

अंजीर
महाराष्ट्रातील पुणे (राजवाडी)  आणि आसपासचा परिसर हा अंजीरसाठी प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या प्रमाणात अंजिराचं उत्पादन केले जाते. हिवाळ्याच्या सुरुवातीला अंजीर आपल्याला बाजारात दिसतात. हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी अंजीर खाण्यास प्राधान्य दिले जाते.

हापूस आंबा
महाराष्ट्रातील रत्नागिरी हापूस आंब्याची चवच न्यारी. हापूस आंबा त्याच्या अप्रतिम चवीमुळे सातासमुद्रापार जाऊन पोहोचला आहे. लहानापासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना आंबा खायला आवडतो. आंबा डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करतो. आणि कैरीचे पन्हे हे उष्माघातापासून बचाव करते.

मोसंबी
महाराष्ट्राची मोसंबी देशात सर्वदूर परिचित आहे. महाराष्ट्रातील अत्यंत गोड, रसाळ मोसंबी अनेकांना आवडते. महाराष्ट्रात औरंगाबाद, जालना आणि श्रीरामपूरमध्ये मोसंबी फळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. मोसंबी फळ हे अतिशय गुणकारी फळ आहे. पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी मोसंबीचा वापर अधिक करणे उत्तमच. तसेच मोसंबी खाल्ल्याने पचनशक्तीही सुधारते. 

कलिंगड
महाराष्ट्राच्या मुंबई भागातील डहाणू, पालघर आणि अलिबाग या भागात मोठ्या प्रमाणावर कलिंगडचे उत्पादन घेतले जाते. कलिंगड हे अत्यंत गुणकारी असून उत्तम टॉनिक मानले जाते. उन्हाळ्यातील सुरुवातीच्या दिवसात तयार होणारे कलिंगड हे फळ आपल्यासाठी एक वरदानच ठरते. प्रखर उष्णतेने अंगाची लाहीलाही होते, त्यावेळी कलिंगडच्या सेवनामुळे शरीराला शीतलता प्राप्त होते. आणि अतिघामामुळे निर्माण झालेला थकवा दूर होऊन काम करण्यास उत्साह निर्माण होतो.

नारळ
महाराष्ट्रात ज्या कल्पवृक्षाला सर्वच ठिकाणी महत्त्वाचे स्थान आहे. तो नारळ आणि नारळाचा जिल्हा म्हणून रत्नागिरी या जिल्ह्याकडे पाहिले जाते. तसेच रत्नागिरी, रायगड आणि ठाणे या भागात नारळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. कोकणचा कल्पवृक्ष म्हणजे नारळ. शहाळ्याचे गोड पाणी हे तहान भागवते. हे पाणी शक्तिवर्धक असून आजारपणात खूप उपयोगी ठरते. 

काजू
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये काजूचे मोठ्या प्रमाणात उत्पादक होते. नेहमीच आपण दुधाची खिरी, गोड शिरा आणि बिर्याणीमध्ये सर्वाच्या सुपरिचित असलेला काजूचा वापर करतो. 

फणस
महाराष्ट्रात ठाणे, रायगड आणि रत्नागिरी भागात फणसचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. कोकणात आंब्याच्या बरोबरीने फणस हे जणू समीकरणच बनले आहे. फणसच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य उत्तम राहते आणि शरीरातील रक्ताभिसरणही चांगलं राहतं. 

डाळींब
महाराष्ट्रातील सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यात डाळींबचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. याबरोबरच नाशिक, पुणे, सांगली, सातारा येथे डाळींबाचे उत्पादन केले जाते. डाळींब हे पित्तनाशक फळ आहे. डाळींबाचे रस प्यायल्याने रक्ताभिसरण क्रिया सुधारते. 

बोर
महाराष्ट्रातील सोलापूर आणि अहमदनगर येथील जिल्ह्यात बोरफळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. लहान आणि मोठ्या आकारात बोरं असतात. कामामुळे आलेला ताण हलका करण्याची क्षमता या फळात आहे. बोरं खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

स्ट्रॉबेरी
महाराष्ट्रातील काश्‍मीर अशी ओळख असलेले महाबळेश्‍वर शहर. हे थंड हवेचं ठिकाण आणि लाल रंगाची रसाळ स्ट्रॉबेरी या दोहोंमुळे अधिक प्रसिध्द आहे. स्ट्रॉबेरीचे सेवन केल्याने ह्रदयविकार आणि मधुमेहावर मात करता येते. तसेच स्ट्रॉबेरी खाल्ल्याने काम केल्यावर दिवसभरात आलेला थकवा कमी होतो.

महाराष्ट्रातील फळांची प्रसिध्द ठिकाण

  • फळे                 प्रसिध्द ठिकाण
  1. संत्री                 नागपूर, अमरावती
  2. द्राक्षे                 नाशिक, सांगली
  3. चिकू                घोलवड, डहाणू, ठाणे
  4. सिताफळ         दौलताबाद (औंरगाबाद)
  5. केळी               जळगाव, वसई
  6. अंजीर              राजेवाडी (पुणे)
  7. हापूस आंबा      रत्नागिरी, सिंधुदुर्ग
  8. मोसंबी             औरंगाबाद, जालना, श्रीरामपूर
  9. कलिंगड          अलिबाग
  10. नारळ              ठाणे, रायगड, रत्नागिरी
  11. काजू               रत्नागिरी, सिंधुदुर्ग
  12. फणस             ठाणे, रायगड, रत्नागिरी
  13. डाळींब            सोलापूर, अहमदनगर
  14. बोर                 सोलापूर, अहमदनगर
  15. स्ट्रॉबेरी             महाबळेश्‍वर (सातारा)

maharashtra and vide variety of fruits those are produced in maharashtra

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com