विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार का? समोर आली महत्वाची माहिती

Maharashtra Assembly Speaker Election
Maharashtra Assembly Speaker Electiongoogle

मुंबई : सध्या विधानसभेचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session 2021) सुरू आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार असल्याचे सांगण्यात आले होते. राज्यपालांनी या निवडणुकीच्या बदललेल्या नियमांवर आक्षेप घेतला होता. तरीही ठाकरे सरकार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Maharashtra Assembly Speaker Election) घेण्यावर ठाम असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता वेळेवर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Assembly Speaker Election
विधानसभा अध्यक्षपदाचा पेच सुटेना; राज्यपालांचे सरकारला पत्र

नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर अद्यापही विधानसभेला अध्यक्ष मिळालेला नाही. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याचं ठाकरे सरकारने ठरवलं होतं. त्यासाठी निवडणुकीच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले होते. आवाजी पद्धतीनं ही निवडणूक घेण्यात येणार होती. पण, राज्यपालांनी ठाकरे सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी नियमात केलेले बदल यावर आक्षेप घेतला. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कायदेशीर सल्ला घेणार असल्याचं म्हटलं होतं.

राज्यपालांच्या पत्रानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील राज्यपालांना खरमरीत पत्र लिहिले आहे. राज्यपालांकडून सरकारच्या कायद्यांवर अविश्वास दाखवला. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच पत्रात निवडणूक घेण्याबाबत सरकार ठाम असल्याचही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. कायदे मंडळाने काय कायदे केले, ते तपासण्याचा अधिकार राज्यपाल म्हणून तुम्हाला नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं होतं. मात्र, परत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्राला उत्तर दिलं आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नसल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com