
Maharashtra Budget Session: उद्धव ठाकरेंनी 'त्या' व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण, म्हणाले...
अधिवेशन आता संपत आलेलं असताना विधानभवनात आज वेगळंच चित्र पाहायला मिळालं. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एकेकाळचे मित्र पण आताचे कट्टर विरोधक एकत्रच विधानभवनात एकत्र येताना दिसले.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सध्या शेवटचा आठवडा सुरू आहे. या अधिवेशनामध्ये आज देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्रच येताना दिसले. त्यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सभागृहाचं कामकाज सुरू होत असताना या दोघांनी एकत्रच हसत हसत विधानभवनात प्रवेश केला.
शिवसेनेतल्या बंडापासून आज पहिल्यांदाच हे दोघे एकत्र दिसले. दरम्यान यावर आता उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, आधी खुले पणा होता, आता बंद दाराआड चर्चा देखील फलदायी होते असं म्हणतात, कधी तरी आमची बंद दाराआड चर्चा झाली तर तेव्हा बोलू, आज आम्ही दोघे एकत्र प्रवेश द्वारातून येताना एकमेकांशी राम राम म्हणतात तसं ते झालं" अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
फडणवीस आणि ठाकरे हे दोघेही चालत येत असताना काहीतरी चर्चाही करताना दिसले. तोंडावर हात ठेवून उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना काहीतरी सांगताना दिसत आहेत. हे दृश्य पाहून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं मात्र आता त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे..