

Maharashtra Cabinet Decisions
esakal
Maharashtra Irrigation Project : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पुणे जिल्ह्यातील कुकडी पाटबंधारे प्रकल्पाला मोठी चालना मिळाली आहे. या प्रकल्पाच्या सुधारित ५७०४.५० कोटी रुपयांच्या खर्चाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे तब्बल १ लाख ४४ हजार ९१२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार असून, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गृह, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा विभागाशी संबंधित निर्णय घेण्यात आले.