maharashtra cabinet decisions
esakal
राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. पर्यावरण, तंत्रज्ञान, शिक्षण आणि सामाजिक न्याय या सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारे हे निर्णय राज्याच्या भविष्यासाठी दिशा ठरवणारे मानले जात आहेत.
राज्यात हरित महाराष्ट्र आयोग स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या आयोगाच्या माध्यमातून तब्बल तीनशे कोटी वृक्ष लागवडीची महत्वाकांक्षी मोहीम राबवली जाणार आहे. यासोबतच पायाभूत सुविधा प्रकल्पांचे नियोजन, अंमलबजावणी आणि नियंत्रण यावरही आयोग लक्ष ठेवणार आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा मोठा टप्पा मानला जात आहे.