
महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी नागपूरमध्ये आज झाला. या मंत्रिमंडळात एकूण ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये ३३ कॅबिनेट मंत्री तर ६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. आज शपथविधी घेतलेल्यांमध्ये भाजपच्या १९, शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचा समावेश आहे. शपथविधीनंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीनंतर चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असून यावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे.