
Maharashtra Cabinet Swearing in Ceremony Marathi News : महायुती सरकारच्या मुख्यमंत्री अन् मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला १४ राज्यांचे मुख्यमंत्री अन् धार्मिक नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे याची यादी समोर आली आहे.
भाजपकडून या महत्वाच्या नेत्यांना शपथविधीचं आमंत्रण देण्यात आलं आहे. ५ डिसेंबर रोजी हा शपथविधीचा सोहळा मुंबईतील आझाद मैदानात पार पडणार आहे. यासाठी सध्या जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती भाजपच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे.