
Video : अखेर उद्धव ठाकरेंनी 'वर्षा' निवासस्थान सोडलं!
मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर घडणाऱ्या राजकीय घडमोडींमध्ये आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी शासकीय निवास्थान सोडलं आहे. काही वेळापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधतांना ठाकरेंनी आपण वर्षा बंगल्यातून आज बाहेर पडणार असून, येथून मातोश्री येथे जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता अखेर उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यातून सामानासह बाहेर पडले आहेत. यावेळी हजारो शिवसैनिक उपस्थित होते. (Uddhav Thackeray News)
वरूण सरदेसाईंची देहबोली भावनिक
दरम्यान, वर्षा बंगला सोडताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह वरूण सरदेसाई हेदेखील उपस्थित होते. यावेळी सरदेसाईंना काही माध्यम प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी केवळ वज्रमुठ दाखवली. मात्र, यावेळी वरूण यांची देहबोली ही भावनिक असल्याची दिसून येत होती. एवढेच नव्हे तर, त्यांच्या डोळेदेखील काहीसे पाणावलेलं दिसत होते.
काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजीनामा देणार नाहीत, आम्ही लढत राहू असे सांगितले होते. तसेच मुख्यमंत्री वर्षा बंगल्याहून मातोश्रीवर राहण्यासाठी निघाले आहेत. मोह माया सत्ता याचा आम्हाला अजिबात लोभ नाही आम्ही लढणारे लोक आहोत, लढत राहू. अखेर सत्याचा विजय होईल असे विधान संजय राऊत यांनी केलं होतं.
हेही वाचा: Uddhav Thackeray : ‘रश्मी ठाकरेंच्या एंट्रीमुळेच शिवसेना अडचणीत’
महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे : एकनाथ शिंदेंचं ट्वीट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) फेसबुकच्या माध्यामातून संवाद साधाल्यानंतर बंडखोर म्हणून चर्चेत आलेल्या एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) चार मुद्द्यांमध्ये सूचक ट्वीट केले आहे. शिंदे यांचे हे दिवसभारातील दूसरं ट्वीट आहे. (Eknath Shinde News)
एकनाथ शिंदेच्या ट्वीटमध्ये नेमकं काय?
1. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला, आणि शिवसैनिक भरडला गेला. 2. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. त्याशिवाय 3. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक. तर चौथ्या मुद्द्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे असल्याच्या थेट मत व्यक्त केले आहे. (Eknath Shinde Tweet)
अडीच वर्षांचा प्रवास... फेसबुक लाईव्ह ते फेसबुक लाईव्ह!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काहीवेळीपूर्वी फेसबुक संवाद साधला होता. त्यांच्या या संवादानंतर भाजपचे नेेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत ठाकरेंवर खोचक टीका केली होती. यामध्ये त्यांनी ‘अडीच वर्षांचा प्रवास... फेसबुक लाईव्ह ते फेसबुक लाईव्ह!’ असा खोचक टोला लगावला आहे.
महाविकास आघाडीचे सरकार आले आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. सोबतच देशात कोरोना विषाणू आला. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले होते. या काळात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊनदेखील लावण्यात आले. लॉकडाऊन नियमांमध्ये वेळोवेळी अनेक बदल करण्यात येत होते. यावेळी नागरिकांशी संवाद साधण्याचा एकमेव मार्ग हा फेसबुक लाईव्ह होता. त्यावेळी अनेकदा उद्धव ठाकरेंनी जनतेशी फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत होते. आजही त्यांनी त्यांनी जनतेशी फेसबुक लाईव्हच्याच माध्यमातून संवाद साधला. त्यानंतर भातखळकर यांनी ट्वीट करत अडीच वर्षांचा प्रवास...फेसबुक लाईव्ह ते फेसबुक लाईव्ह! असा खोचक टोला लगावला आहे.
Web Title: Maharashtra Cm Uddhav Thackeray Along With His Family Leaves From His Official Residence Varsha Banglow
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..