शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कर्जमुक्तीच्या याद्या 'या' तारखेपासून होणार प्रसिद्ध!

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

नगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलडाणा, जळगाव, जालना, नांदेड, नाशिक, परभणी, रायगड या जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांची एक लाखापेक्षा जास्त संख्या आहे.

मुंबई : राज्यातील सुमारे 36 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देणारी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना 15 एप्रिलपूर्वी पूर्ण केली जाणार आहे. त्यासाठी तारखेनुसारचे नियोजन आज राज्य सरकारने जाहीर केले असून, 21 फेब्रुवारीपासून गावनिहाय याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जवळपास 70 दिवसांनंतर उद्धव ठाकरे यांनी 'वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावरून पहिली बैठक ठाकरे यांनी घेतली. 
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून योजनेच्या प्रत्यक्षात अंमलबजावणीस सुरुवात झाल्यापासून दररोज त्याचा आढावा घेतला जाणार आहे. 

उद्धव ठाकरे यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि बॅंकेच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. कर्जमुक्ती योजनेचा आढावा मुख्यमंत्र्यांनी जिल्हा यंत्रणेशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते. 

- शहरांत राहताय की उष्णतेच्या बेटावर? पुणे शहराबाबत IIT म्हणते...

ही कर्जमुक्ती राबविताना शेतकऱ्यावर आपण उपकार करतोय, या भावनेतून काम करू नका, असे स्पष्ट करतानाच शेतकरी शासनाकडे आशेने पाहतोय त्याचे समाधान करा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ही योजना डिसेंबरमध्ये जाहीर केली आणि तिची अंमलबजावणी मार्चपासून करू, असा शब्द शेतकऱ्याला दिला आहे. शेतकऱ्याने आतापर्यंत जो विश्वास दाखविला आहे त्याला तडा जाऊ देऊ नका, असे आवाहन करतानाच कर्जमुक्तीची ही देशातली सर्वात मोठी योजना असल्याचे सांगून संपूर्ण देशाचे आपल्याकडे लक्ष आहे, असे मुख्यमंत्र्यांनी जिल्हा यंत्रणेला सांगितले. 

दरम्यान, कर्जमुक्ती योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या पोर्टलवर 88 टक्के डेटा अपलोड करण्यात आला आहे. सुमारे 36.41 लाख शेतकऱ्यांनी दोन लाख रुपयांपर्यंत पीककर्ज घेतले आहे. त्यापैकी 32 लाख 16 हजार 278 शेतकऱ्यांची माहिती अपलोड झाली आहे. 

- Coronavirus : कोरोनामुळे मिरची उत्पादक हैराण!

नगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलडाणा, जळगाव, जालना, नांदेड, नाशिक, परभणी, रायगड या जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांची एक लाखापेक्षा जास्त संख्या आहे. कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडणीचे प्रमाण 95 टक्के आहे. त्यामध्ये व्यापारी बॅंकांचे 65.53 टक्के; तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांचे प्रमाण 63.96 टक्के आहे. 

आधार प्रमाणीकरणासाठी राज्यभरात 8 हजार 184 केंद्रे बॅंकांमध्ये सुरू करण्यात येतील. 26 हजार 770 आपले सेवा केंद्रे, 8 हजार 815 सामाईक सुविधा केंद्रे आणि 52 हजार स्वस्त धान्य दुकाने अशा 95 हजार 769 केंद्रांवर प्रमाणीकरणाची सुविधा आहे. 

- हिंगणघाट प्रकरण : आनंद महिंद्रा पीडिता आणि कुटुंबीयांच्या पाठीशी!

या वेळी सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्‍ला यांनी सादरीकरण केले. बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवासन आदी अधिकारी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra CM Uddhav Thackeray announces loan waiver farmers list